Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता जमा; महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास सुरुवात

Published : Feb 24, 2026, 02:12 PM IST
Ladki Bahin Yojana

सार

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 98 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला असून ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभार्थी संख्येत घट झाली आहे. 

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास विभागाने 23 जानेवारीपासून रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली. सोमवारी रात्रीपासून अनेक महिलांना खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत.

98 कोटींची रक्कम वर्ग; हप्त्याची प्रक्रिया सुरू

जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाकडे 98 कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली होती. निधी प्राप्त झाल्यानंतर सोमवारपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली. विभागाने अधिकृतरित्या याची माहिती दिली आहे.

ई-केवायसीमुळे लाभार्थी संख्येत घट?

डिसेंबर 2025 चा हप्ता जानेवारी महिन्यात 14 तारखेदरम्यान सुमारे 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सुरुवातीला या योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 46 लाख महिला नोंदणीकृत होत्या. मात्र राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट झाल्याचे दिसून आले. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार 1 कोटी 90 लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी पात्र 1 कोटी 60 लाख महिलांनाच हप्ता मिळाला.

ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत

ई-केवायसी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे त्यांना हप्ता मिळण्यात अडचणी आल्या. त्यामुळे सरकारने लाभार्थींना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीसाठी अंतिम संधी दिली आहे. पात्र महिलांनी वेळेत दुरुस्ती करून हप्त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत 19 हप्ते जमा

जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत जानेवारी 2026 पर्यंत एकूण 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये अतिरिक्त दिले जातात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळीचा कडाका! १२ जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'; उकाड्यातून सुटका की संकट?
स्वेच्छेने धर्मांतर करायचंय? मग 'ही' प्रक्रिया आहे अनिवार्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडला नवा नियम