Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, ठाणे-जळगावसह काही जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट

Published : Oct 26, 2025, 06:38 PM IST

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या उष्णतेतून दिलासा देणारा पाऊस पडत आहे, मात्र हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे आणि जळगाव जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

PREV
15
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रातील हवामान अचानक बदलत आहे. ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेने राज्यातील नागरिक त्रस्त असताना, पावसाच्या सरींनी थोडा दिलासा दिला आहे. आज, हवामान विभागाने मध्यम ते जोरदार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

कोकणातील अनेक भागांमध्ये आज वादळी पाऊस आणि वारा याची शक्यता आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाची नजरेत आली आहे. 

25
रेड अलर्ट जिल्हे

हवामान विभागाने ठाणे आणि जळगाव जिल्ह्यांसह काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तासांत या भागात मध्यम ते जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वारा 30–40 किमी/तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळीपासूनच राज्यभरात मुसळधार पावसाचे प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत. 21 ऑक्टोबरपासून अनेक ठिकाणी पावसाने नुकसान पोहचवले आहे. 

35
मुंबईतील हवामान

मुंबईसह आसपासच्या परिसरात दुपारी आकाश ढगाळले होते. सकाळी निरभ्र असलेले आकाश दुपारी अचानक अंशतः ढगाळ झाले, आणि नंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील तापमान थोडं कमी झालं आणि वातावरण थंडगार बनलं. 

45
नागरिकांसाठी सूचना

उंच इमारती किंवा झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी रहा.

वीज व वाऱ्यामुळे येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक तयारी ठेवा.

प्रवास करताना हवामानाचा ताजी माहिती तपासा. 

55
पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडावा

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडावा आणि ताजेतवाने वातावरण निर्माण झाले आहे, पण रेड अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories