FYJC First Merit List : अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर! लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार

Published : May 29, 2026, 10:21 AM IST
FYJC First Merit List Maharashtra

सार

FYJC First Merit List : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी आज सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. यंदा १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ९ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करून पहिल्या फेरीत सहभाग निश्चित केला आहे. प्रवेश प्रक्रिया २९ मे ते ३ जूनपर्यंत चालणार आहे.

FYJC First Merit List : राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या नियमित फेरीची प्रतीक्षा अखेर संपणार असून आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता पहिली प्रवेश यादी जाहीर होणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष या यादीकडे लागले असून, यंदा तब्बल ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २१ लाखांहून अधिक जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

यंदा राज्यभरातून अकरावी प्रवेशासाठी एकूण १२ लाख ४९ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज ‘लॉक’ करून पहिल्या नियमित फेरीत सहभाग निश्चित केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी केवळ नोंदणी केली असली, तरी अर्ज अंतिम न केल्यामुळे त्यांना पहिल्या फेरीत संधी मिळणार नाही. मात्र, अशा विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार आहे.

२१ लाखांहून अधिक जागा उपलब्ध

राज्यातील एकूण २१ लाख ९८ हजार ६६६ जागांपैकी १७ लाख ४२ हजार ४२३ जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. विविध कोटा प्रवेशांतर्गत आतापर्यंत ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे सध्या २१ लाख ५९ हजार ५३ जागा रिक्त उपलब्ध आहेत. त्यामुळे पहिल्याच फेरीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखा

पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया २९ मे ते ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना जर पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असेल, तर त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे.

पहिल्या फेरीची महत्त्वाची आकडेवारी

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे:

  • एकूण कनिष्ठ महाविद्यालये : ९,५९१ 
  • एकूण उपलब्ध जागा : २१,९८,६६६ 
  • केंद्रीय ऑनलाइन प्रवेशांतर्गत जागा : १७,४२,४२३ 
  • कोटा प्रवेशांतर्गत झालेले प्रवेश : ३९,६१३ 
  • सध्या रिक्त जागा : २१,५९,०५३ 
  • एकूण नोंदणी केलेले विद्यार्थी : १२,४९,५१६ 
  • अर्ज ‘लॉक’ केलेले विद्यार्थी : ९,०४,०००

विद्यार्थी-पालकांचे लक्ष पहिल्या यादीकडे

पहिल्या प्रवेश यादीत विद्यार्थ्यांना कोणते महाविद्यालय मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेषतः नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पहिल्या यादीकडे विद्यार्थी आणि पालक दोघांचेही लक्ष लागले आहे.

### Keywords

 

### Slug

 

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक