महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मोठा खुलासा : "लाडकी बहीण" योजनेमुळेच शेतकरी कर्जमाफीला विलंब, मंत्री प्रकाश आबिटकर यांचा गौप्यस्फोट

Published : Jun 14, 2025, 06:10 PM IST
prakash abitkar

सार

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून शेतकरी कर्जमाफीबाबत एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'लाडकी बहीण' योजनेमुळे कर्जमाफीच्या निर्णयाला विलंब होत असल्याचा दावा केला आहे.

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड हालचाली सुरू असताना राज्याच्या मंत्रिमंडळातून एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारकडून अद्याप ठोस निर्णय का घेतला जात नाही, यावर अखेर खुद्द मंत्री प्रकाश आबिटकर यांनीच मौन सोडलं आहे. सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेमुळेच कर्जमाफीच्या निर्णयाला विलंब होत असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

"लाडकी बहीण" योजनेचा भार आणि कर्जमाफीतील अडथळा

राज्य सरकारच्या "लाडकी बहीण" या योजना सध्या महिलांसाठी आश्वासक ठरत असल्या, तरी या योजनेचा आर्थिक भार सरकारवर मोठ्या प्रमाणात पडत आहे. याचमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडल्याचं प्रतिपादन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, "राज्य चालवत असताना 'लाडकी बहीण' योजनेसाठी मोठा निधी लागत आहे, त्यामुळेच कर्जमाफीला उशीर होत आहे."

या विधानामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तर सलग सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. त्यांचा लढा सरकारच्या लक्षात येण्यासाठीच होता, असे त्यांनी स्पष्ट केलं होतं.

"वेळकाढूपण नव्हे, तर आर्थिक जबाबदारी", आबिटकर यांची स्पष्टोक्ती

आबिटकर म्हणाले, "सरकारकडून उशीर होणं म्हणजे वेळकाढूपणा नाही. सध्या आर्थिकदृष्ट्या सरकारवर प्रचंड बर्डन आहे. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे." त्यांनी बच्चू कडूंना शेतकऱ्यांचा खरा लढवय्या नेता म्हणून गौरवले आणि त्यांची तब्येतही सरकारसाठी महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

पंढरपूर वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष तयारी केली आहे. मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, “वारीसाठी 1500 डॉक्टरांचा स्टाफ, ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.” करोनाबाबतही त्यांनी आश्वस्त केलं. "सध्या करोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य काळजी घेतली जाईल."

राजकीय भूकंपाची नांदी?

प्रकाश आबिटकर यांचा हा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चा आणि वादाला तोंड फोडणारा ठरत आहे. महिलांसाठीची महत्त्वाची योजना आणि शेतकऱ्यांसाठीची अपेक्षित कर्जमाफी या दोघांमधील समतोल साधणं हे सरकारसमोरील सर्वात मोठं आव्हान बनलं आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!