महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत पोलमध्ये अंदाज वर्तवला असून त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर हालचालींना वेग निर्माण झाला आहे. महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जाणार असून अपक्षांची मदत घेतली जाणार आहे. निवडून आलेल्या अपक्षांना सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
काँग्रेसकडून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न केले जाणार असून संजय राऊत आणि नाना पटोले या दोघांमध्ये या मुद्यावरून वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महवकास आघाडीने शांततेची भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण राहील याबाबत दवे प्रतिदावे केले जात आहेत. आता भाजपाला जास्त जागा मिळाल्यास त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे.
मी महाविकास आघाडीतून इच्छुक होतो. पण मला ऐनवेळी तिकीट दिलं नाही. प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलेलं होतं, पण त्यांनी उशिरा म्हणजे काल पाठिंबा जाहीर केला. त्यांनी जर 8 दिवस आधीच पाठिंबा जाहीर केला असता तर कदाचित आणखी चांगले झाले असते, अशी खंत धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली, असं सोलापूर येथून बंडखोर असलेल्या उमेदवाराने खंत व्यक्त केली आहे.