महाराष्ट्रातील राजकारणात पवार कुटुंबाने राज्य केलं आहे. त्यांनी या राज्याच्या राजकारणात महत्वाचं काम केलं आहे. शरद पवार यांच्याकडे दरवेळी पाडवा कार्यक्रमाच्या निमित्ताने नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहत असतात. यावर्षी भाऊबीजेला अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघे यावर्षी एकत्र येणार का नाही या प्रश्नाचे उत्तर अजित पवार यांनी देऊन हा प्रश्न संपवला आहे.
अजित पवार काय म्हणाले? -
मला लाडक्या बहिणींनी सकाळी ओवाळले आहे. त्यामुळे मी भाऊबीजेला जाणार नाही. आता मी कार्यक्रम संपवातोय, असे म्हणून अजित पवार यांनी हा विषय पूर्णपणे संपवला आहे. अजित पवार यांना दरवेळी सुप्रिया सुळे या भाऊबीजेला ओवाळत असतात. यावर्षी अजित पवार यांनी असं बोलून बहीण भावातील नातं पूर्णपणे संपल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पवार कुटुंबात दरवर्षी दोन पाडवे साजरे केले जाणार -
पवार कुटुंबात यावर्षी दोन ठिकाणी दिवाळी पाडवे साजरे केले जाणार आहेत. एक गोविंद बाग येथे तर दुसरा काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. गोविंद बागेत शरद पवार यांचा तर काटेवाडीमध्ये अजित पवार यांचा दिवाळी पाडवा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.