सध्याच्या राजकारणात एकमेकांवर टीका टिप्पणी होताना दिसत आहे. आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. यावेळी बोलताना राऊत यांनी बोलताना म्हटले आहे की, “राज ठाकरे हे गेल्या 25 वर्षांपासून भाजपाच स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणे, कधी एकनाथ शिंदे यांचं स्क्रिप्ट वाचतात. तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी स्वत:च शिवसेना पक्ष सोडला. त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. याक्षणी अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना मदत होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेतोय असं दिसत नाही”
भुजबळांना तुम्ही जेवायला बोलावत नाही का? -
उद्धव ठाकरे हे नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंचा द्वेष करतात. बाळासाहेबांना सर्वात जास्त त्रास ज्या छगन भुजबळांनी दिला, त्यांना घरी जेवायला बोलावलं अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मग, भुजबळांना तुम्ही जेवायला बोलवत नाही का? नारणय राणेंना मिठ्या मारत नाही का? एकनाथ शिंदेंना तुम्ही जेवायला बोलवत नाही का?” “आमच्यावर अत्याचार झाला नाही का? आम्ही पक्ष सोडला नाही, आम्हाला कमी त्रास झाला नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेते आहोत आणि राहणार” असं राऊत यांनी म्हटलं आहे.