Maharashtra Election : राहुल गांधी अराजकता पसरवणारे नेते, फडणवीसांनी केली टीका

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. राहुल गांधी आता काँग्रेस राहिले नाहीत आणि ते अर्बन नक्षल्यांच्या विचारांनी घेरले गेले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात निवडणूका तोंडावर आहेत. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची कोणीच संधी सोडत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राहुल गांधींनी टीका केली आहे. यावेळी लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? - 
“राहुल गांधी हे आता काँग्रेस राहिले नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली आहे. ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. ते आता कट्टरपंथी विचारधारेकडे वळले आहेत. त्यामुळेच ते ओरिजनल निळ्या रंगाऐवजी ते लाल रंगाचं कव्हर असलेली संविधानाची प्रत दाखवत असतात” असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

भारत जोडो यात्रेमुळे अराजकता पसरवणारी आहे -
“राहुल गांधी यांनी भारत जोडो सुरू केलं होतं तेव्हा चांगली योजना आहे वाटलं होतं. किमान भारत त्यांच्या अजेंड्यावर आहे. पण त्यात १८० अशा संघटनांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये अराजकता पसरवणारे होते. हे रेकॉर्डवर आहे. राहुल गांधींनी एका हातात संविधान धरलंय पण त्यांचं काम मात्र अराजकता पसरवणारं आहे. भारत जोडो समूहामध्ये सहभागी झालेल्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय एक्सट्रीम डाव्या विचारायचे आहेत. त्यांची ध्येयधोरणे आणि कामाची पद्धत बघितली तर ती अराजकता पसरवण्याची आहे”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

Read more Articles on
Share this article