Maharashtra Weather LATEST update : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर थंडी पुन्हा परतणार आहे. २८ नोव्हेंबरपासून मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात घट होणार असून, काही ठिकाणी दाट धुके पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई : राज्यात काही दिवस वाढलेल्या तापमानामुळे थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा हवामानाचा पारा खाली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 28 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये गारठा वाढणार असून हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाहूया आपल्या शहरात आज आणि पुढील काही दिवस तापमान कसे बदलणार आहे.
27
मुंबई : थंडीची चाहूल पुन्हा जाणवणार
मुंबई आणि उपनगरात आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार आहे.
कमाल तापमान : सुमारे 30°C
किमान तापमान : 22°C
आगामी दिवसांत तापमानात अधिक घट होऊ शकते. 3 डिसेंबरपर्यंत किमान तापमान 18°C पर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना पुन्हा गारवा अनुभवायला मिळणार आहे.
37
पुणे : किमान तापमान कोसळणार
पुणेकरांसाठी पुढील 2 ते 3 दिवस अधिक थंड असणार आहेत.
किमान तापमान 13°C पर्यंत घसरू शकते.
1 डिसेंबरनंतर मात्र ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने तापमान थोडे वाढू शकते.
29, 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
57
मराठवाडा : थंडी वाढण्याची लक्षणे स्पष्ट
संभाजीनगरमध्ये 28 नोव्हेंबर रोजी
किमान तापमान : 14°C
कमाल तापमान : 31°C
29 तारखेला किमान तापमान आणखी घसरून 13°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
67
विदर्भ : धुके आणि थंडीचा मिलाफ
विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. नागपूरमध्ये 28 नोव्हेंबर रोजी
किमान तापमान : 16°C
कमाल तापमान : 28°C
विदर्भातील तापमानात चढ-उतार सुरुच राहणार आहेत.
77
राज्यात पुन्हा गारठ्याची एंट्री
गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले होते आणि थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला होता. पण पुन्हा एकदा थंडीची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे. येणारे दिवस नागरिकांसाठी थंडगार ठरणार आहेत.