खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा : सीएम शिंदे

Published : Aug 17, 2024, 04:35 PM IST
chief minister eknath shinde

सार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी बहिणींना उद्देशून भाषण केले आणि विरोधकांवर टीका केली.

पुणे: पुण्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझी लाडकी बहीण योजनेचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आज मोठ्या मैदानात लाखो बहिणींना बोलावून हा सोहळा करायचा होता. पण स्टेडियममध्ये घेतला. चार मोठे हॉल आहेत. त्यात लाडक्या बहिणी बसल्या आहेत. हा कार्यक्रम लाइव्ह दिसत आहे. कॅबिनेटमध्ये मी सांगितले होते की रक्षा बंधनाच्या आधी हे पैसे पोहोचले पाहिजे. खातं चालतं की नाही हे बघायचं होतं. त्यामुळे एक रुपया टाकायचा सल्ला काहींनी दिला. पण अजितदादा, फडणवीस यांनी सांगितले तीन हजार टाका आणि ट्रायल रन घ्या. लाडक्या बहिणी सांगत असतात खात्यात पैसे आले. तेव्हापासून राखी बांधायचा कार्यक्रम सुरू झाला. बहिणींच्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी नारी शक्ती आल्या आहेत.’

‘मी तुम्हाला वंदनही करतो. कारण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. अनेक बहिणींच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले. सरकारच्या प्रती भावांच्या प्रती आदर पाहिला. दुसरे काय पाहिजे. तुमच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत हीच प्रामाणिक इच्छा आहे. या योजनेबद्दल सर्वांशी चर्चा झाली. त्याची अंमलबजावणी कशी करायची. आर्थिक वर्षाचे नियोजन कसे करायचे हे पाहत होतो. तुम्ही प्रपंच चालवताना कसरत करता, तसे सरकार चालवताना आम्हाला कसरत करावी लागते. पायभूत सुविधांसाठी कर्ज घ्यावे लागते, पगार असतो, पेन्शन असते या सर्व गोष्टी करायच्या असतात. पण बहिणींनाही काही तरी द्यायचे होते. म्हणून ही योजना जाहीर केली.’

‘विरोधक म्हणाले लाडक्या भावाचे काय. यांना कधी तरी लाडक्या भावावर प्रेम होते का. असते तर ते सोडून गेले असते का. पण आम्ही लाडक्या भावांनाही शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली. महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला.’

‘मी सर्वांना पुरुन उरलोय. सावत्र कपटी भावांवर मात करून आलो आहे. फक्त त्यांना लक्षात ठेवा. त्यांना योग्यवेळी जागा दाखवा. भीक देता का, विकत घेता का, लाच घेता का असे शब्द काढायला लागले. या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नाही तरी मनाची वाटायला हवी होती. ते कोर्टातही गेले. कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि बहिणींच्या बाजूने निकाल दिला. खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा.’ अशी टीका ही त्यांनी विरोधकांवर केली.

आणखी वाचा :

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत?, घरबसल्या आधार लिंक करा

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती