पावसाच्या थैमानातही बैलपोळ्याचा उत्साह: मराठवाड्यात शेतकऱ्यांची वेगळीच श्रद्धा

राज्यभरात बैलपोळा उत्साहात साजरा होत असताना मराठवाड्यातील शेतकरी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर श्रद्धेने हा सण साजरा करत आहेत. आधुनिकीकरणाच्या युगातही बैलांवरील प्रेम आणि आपुलकी कायम असल्याचे दिसून येत आहे.
Rameshwar Gavhane | Published : Sep 2, 2024 2:07 PM IST / Updated: Sep 02 2024, 07:42 PM IST
14

राज्यभरात आज बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, मात्र मराठवाड्यात यंदा पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही आपल्या परळी तालुक्यातील नाथ्रा गावाकडे शेतात जाऊन बैलांची पूजा केली, बैलपोळा सण गावाकडील माणसांसोबत राहून साजरा केला.

24

राज्यातील गावागावात बैलपोळा साजरा होत असून बैलजोडी घरी आणून त्यांची पूजा केली जाते, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रति प्रेम आणि आपुलकी दाखवायचा आजचा दिवस आहे.

34

ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने बैलपोळा साजरा होत आहे. मात्र, आता बहुतांश शेतकरी प्रगतशील झाल्याने त्यांच्याकडे ट्रॅक्टर आणि इतर सामुग्री आली आहे.

44

आधुनिकीकरणाच्या युगात बैलांपासून शेतकरीही दूर जात आहे. पण, आजही गावकडं बैलपोळा सण तितक्यात आपुलकीने आणि प्रेमभावनेतून साजरा केला जातो. मात्र, पावसाची अडचण दूर करत वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढून हा सण साजरा केला जात आहे. जिवा शिवाजी बैल जोड म्हणत बैलांची मिरवणूक निघतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

Share this Photo Gallery
Recommended Photos