महाराष्ट्रातील नेत्यांचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल मत काय? घ्या जाणून

Published : Nov 23, 2024, 09:31 AM ISTUpdated : Nov 23, 2024, 09:34 AM IST
Maharashtra Assembly Election Result 2024 Political Reaction

सार

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 च्या जागांवरील निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राज्यातील राजकीय पक्षांतील नेत्यांनी निकालाबद्दल काय मत व्यक्त केलेय हे जाणून घेऊया…

Maharashtra Assembly Election Result 2024 Political Reaction : महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 20 नोव्हेंबरला झालेल्या विधानसभेच्या मतदानानंतर आज (23 नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. अशातच कोणाचा उमेदवार बाजी मारणार, कोणाची सत्ता स्थापन होणार हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी निकालाबद्दल काय मत व्यक्त केलेय हे जाणून घेऊया...

महाराष्ट्राचे राजकीय गणित
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला सर्व 288 जागांवर 95 टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर मतदान झाले. सत्तारुढ महायुतीत भाजपाने 149 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 81 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 59 जागांवर निवडणूक लढवण्यात आली. याशिवाय महाविकास आघआडीमध्ये असणाऱ्या काँग्रेसने 101, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 95 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 86 जागांवर निवडणूक लढवली होती.

प्रियांका चतुर्वेदी यांचे निकालाबद्दलचे मत
महाराष्ट्रातील आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंच्या गटातील खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले की, "निकालासंदर्भातील सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. पण निकालासंदर्भातील काही गोष्टी 11 ते 12 दरम्यान पूर्णपणे स्पष्ट होईल. मात्र महाराष्ट्रातील जतना महाविकास घाडीला विजय मिळवून देतील. आम्हाला पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी संधी मिळू शकते. राज्याने अडीच वर्षात ज्या पद्धतीने भ्रष्टाचार, लुटमार, महिलांवरील गुन्हे, शेतकऱ्यांचे प्रश्न पाहिले आणि ज्या पद्धतीने दिल्लीत सरकार चालवण्याचा प्रयत्न केला, ते महाराष्ट्रानेही पाहिले. आमचा विजय निश्चित आहे आणि मला विश्वास आहे की जसजसे निकाल समोर येतील तसतसे आम्ही सर्व आनंद साजरा करू."

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला काय म्हणाले? 
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि झारखंड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीचे सरकार स्थापन होईल. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातील एक्झिट पोल आधीच आले आहे. पण निकालासंदर्भातील काही गोष्टी थोड्याच वेळात स्पष्ट होतील आणि एनडीचा विजय होईल असाही विश्वास शहजाद पुनवाला यांनी व्यक्त केला आहे.

बच्चू कडू निकालाबद्दल काय म्हणाले…
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. बच्चू कडू यांनी म्हटले की, या निवडणुकांमध्ये जाती-धर्माचे राजकारण झाल्याचे मला वाटते. मुद्द्यांवर आधारित चर्चा झाली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला असेही वाटते की महाराष्ट्र कुठेतरी मध्यभागी राहील. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडे झुकणार नाही. आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही..."

भाजपा नेते जाफर इस्लाम यांचे मत
भाजपाचे नेते जाफर इस्लाम यांनी निकालासंदर्भात मत व्यक्त करत म्हटले की, भाजपाला सेंच्युरी गाठता येईल आणि महायुतीची महाराष्ट्रात डबल सेंच्युरी होईल. याशिवाय झारखंडमध्ये आम्ही हाफ-सेंच्युरीने विजय मिळवू."

आणखी वाचा : 

Maharashtra Assembly Election Live Result 2024: बारामतीतून युगेंद्र पवार आघाडीवर

सिद्धिविनायक चरणी पोहोचले मुंबईतील विधानसभेचे उमेदवार...वाचा कोण काय म्हणाले

 

PREV

Recommended Stories

मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कोंडीला ब्रेक, मीरा-भाईंदरमध्ये नवे वाहतूक नियोजन; 15 डिसेंबरपासून अंमलबजावणी
महाराष्ट्राला गतिमानता! पुणे-मुंबई दीड तासात, संभाजीनगरसाठी नवा एक्स्प्रेसवे; नितीन गडकरींची मोठी घोषणा