Central Railway Traffic Block : मध्य रेल्वेने लोणावळा–बीव्हीटी यार्डमधील मार्गविस्ताराच्या कामामुळे ८, १० डिसेंबरला विशेष वाहतूक, पॉवर ब्लॉक जाहीर केला. या कामामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि पुणे उपनगरीय लोकल सेवेच्या वेळापत्रकात बदल होणारय.
लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा अपडेट जाहीर करण्यात आला आहे. लोणावळा–बीव्हीटी यार्डमधील मार्गविस्ताराच्या कामामुळे आगामी काही दिवस रेल्वे वाहतुकीवर थेट परिणाम होणार आहे. अप-डाउन मार्गांसह अतिरिक्त ट्रॅकसाठी करण्यात येणाऱ्या या कामात प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग अशा दोन टप्प्यांचा समावेश असून, त्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आले आहेत.
26
८ डिसेंबर : चार तासांचा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक
सकाळी 11.25 ते दुपारी 3.25 या वेळेत प्री नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यात दीर्घ पल्ल्याच्या व उपनगरीय गाड्यांमध्ये तात्पुरते बदल करण्यात येतील.
36
या कालावधीत होणारे बदल
सीएसएमटी–चेन्नई एक्स्प्रेसला लोणावळा स्थानकात अतिरिक्त 5 मिनिटांचा थांबा.
पुणे उपनगरीय लोकल सेवेवर थेट परिणाम
काही लोकलचे वेळापत्रक बदलले जाईल
काही गाड्या उशिराने धावतील
मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे.