पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
पुणे : पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला. पुण्यात जवळपास 2598 होर्डिंग्ज आहेत त्यापैकी अनेक हे नियमबाह्य आहेत त्यामुळे यावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र काही होर्डिंग उतरवत असताना कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. मुंबईतील घाटकोपर येथे वादळी पावसात होर्डिंग पडून आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका खडबडून जागी झाली आहे.
पुण्यातील खंडोजी बाबा चौकातील होर्डिंग्स काढायला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात शहरातील अनेक ठिकाणी असलेली होर्डिंग्स काढण्यात येणार आहे. पुण्यातील जाहिरात होर्डिंग्जबाबत जिल्हाधिकारी यांनी अहवाल मागितला आहे. पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग्सचा अहवालही मागवण्यात आला आहे. परवानगी देण्यात आलेल्या सर्व जाहिरात पालकांचे स्थापत्य विषयक लेखापरीक्षण नव्याने करून घेण्यास संबंधित जाहिरात फलक धारकाला कळवावे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
2500 परवानग्या आहेत. मात्र तेवढेत अनधिकृतदेखील आहेत. याची सगळी चौकशी करणं सुरु आहे. अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 2598 अधिकृत होर्डिंग्स आहे. शहरात फक्त 85 अनधिकृत होर्डिंग्स आहेत. त्यात हडपसरमध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत होर्डिंग्स आहेत. 2300 होर्डिंगसचं ऑडिट झालं आहे. त्यातील आतापर्यंत एकूण 1564 अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळात होर्डिंग्सवर कारवाई करण्यात येणार आहेत. ऑडिट करण्यासाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे.