उद्धव ठाकरेंचा पासपोर्ट जप्त करा, 4 जूननंतर लंडनला पळून जातील : नितेश राणे

ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे.

 

सिंधुदुर्ग : साधी सरपंच पदाची निवडणूकही न लढवलेले संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि उद्धव ठाकरे शेमड्यासारखे रडताना दिसले, असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टीकास्त्र डागलं आहे. तसेच, ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रड गाऱ्हाणं पाहून पुन्हा मोदीच येणार, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. त्यासोबतच ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे, असंही नितेश राणे म्हणालेत.

"राज्यातील कालच्या मतदानानुसार महायुतीला मनापासून स्विकारलं आहे, हे दिसून आलं. आमचे उमेदवार घासून नाही ठासून येतात. महायुती 45 चा आकडा गाठतेय. ज्यांनी आयुष्यात एक निवडणूक लढवली नाही. मतदान कस मिळवायचं? हे माहीत नसेल, तो मतदानाची पद्धत शिकवत असेल, तर लाजिरवाणी गोष्ट आहे. गल्लीतल्या तीनपट लोकांना मतदानाचा काही माहीत नसेल, महाराष्ट्राच्या जनतेनं मशाल विजवून टाकली आहे.", असं नितेश राणे म्हणाले.

जसं दिशा सालीयन केसचे पुरावे नष्ट केले, तसं पुण्याच्या केसमध्ये होणार नाही : नितेश राणे

पुणे हिट अँड रन प्रकरणाबाबतही नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "पुण्याच्या दुर्घटनेबाबत पोलीस सतर्क आहेत. हे महाविकास आघाडीचं सरकार नाही. जसं दिशा सालीयन केसचे पुरावे नष्ट केले, तसे पुण्याच्या केसमध्ये होणार नाही. संजय राऊत आणि त्याच्या तीनपट भाव भांडुपमध्ये बूथ कॅपचर करण्याचा प्रयत्न करत होते. हे ममता बॅनर्जीच बंगाल नाही महाराष्ट्र आहे.", असं नितेश राणे म्हणाले.

4 जून नंतर सगळे विरोधक हद्दपार दिसतील : नितेश राणे

"महाविकास आघाडीच्या काळात आलेल्या वादळात उद्धव ठाकरेंच्या सरकारनं किती मदत केली? लोकांना आम्ही स्वतः मदत केली आहे. आमचं सरकार भरघोस मदत करणार. विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे. 4 जून नंतर सगळे विरोधक हद्दपार दिसतील. 4 जूनला गुलाल आमचाच असणार, नवा मतदार आणि महिला मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर निघाला आहे. हिंदू मतदारांनी बाहेर पडून मतदान केलंय."

 

Share this article