पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण, रेस्क्यू टीम तैनात

Published : Apr 29, 2025, 10:57 AM IST
leopard

सार

पुणे ः लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी लगेच रेस्क्यू टीम पाठवण्यात आली. बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.

पुणे ः लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी लगेच रेस्क्यू टीम पाठवण्यात आली. बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.

लोहगाव विमानतळावर नागरी आणि लष्करी वापरासाठी आहे. त्यामुळे प्रवासी आणि विमानतळ कर्मचार्यांची कायम वर्दळ असते. तसेच या परिसरात वायुदलाचे स्टेशन असल्याने लष्करी जवानही तैनात असतात. विमानतळाला संरक्षण भींत असून संपूर्ण विमानतळाभोवती मानवी वस्ती आहे. तरीही या परिसरात बिबट्या कसा काय दाखल झाला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचे प्रथम दर्शन झाले. त्यानंतर विमानतळ प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. तर काहींनी ही जंगली मांजर असल्याचे सांगितले आहे. बिबट्या असल्याची माहिती मिळाल्यावर लगेच विमानतळ प्रशासनाच्या कर्मचार्यांनी परिसरात जाऊन बघितले. परंतु, बिबट्या दिसला नाही. त्यानंतर लगेच वन विभागाच्या कर्मचार्यांना अलर्ट करण्यात आले.

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!