विजय वडेट्टीवारांच्या पहलगाम हल्ल्यावरील विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल, म्हणाले...

Published : Apr 29, 2025, 09:55 AM ISTUpdated : Apr 29, 2025, 09:57 AM IST
Chandrashekhar Bawankule

सार

Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या हल्ल्यावरुन केलेल्या विधानावरुन राजकरण तापले आहे. यावरच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule on Vijay Wadettiwar's statement : जम्मू-काश्मीरमधील पहलामगमधील बैसलर घाटात 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटले आहेत. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडल्याच्या दावा केला होता. यावरुनच राजकरण तापले असून आता भापज प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, "पहलगाम हल्ल्याबाबत त्यांनी असंवेदनशील, अतिशय निर्लज्ज विधान केले आहे. त्यांना असे विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही. मोदीजी पाकिस्तानला चांगला धडा शिकवतील. अशा परिस्थितीत संपूर्ण देश मोदीजींच्या पाठीशी उभा आहे..."

 

 

विजय वडेट्टीवार यांचा विधानावरुन यु-टर्न
विजय वडेट्टीवार यांनी धर्म विचारुन गोळ्या घालण्याएवढा वेळ दहशतवाद्यांकडे असतो का असे विधान केले होते. या विधानावरुन वडेट्टीवार यांनी युटर्न घेत म्हटले की, माझे वक्तव्य मोडून तोडून दाखण्यात आले आहे. अर्धवट विधाने दाखवण्याच्या भरोशावर काहीतरी वेगळे वातावरण देशात निर्माण करत काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम काही मीडियाकडून मुद्दाम केले जात आहे. याशिवाय मी केलेले विधान पूर्ण दाखवावे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक