Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत, KYC अनिवार्य करण्यात आले असून 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. अद्याप 1 कोटीहून अधिक महिलांची KYC प्रक्रिया बाकी असल्याने, त्यांना मिळणारी ₹1500 ची मदत बंद होण्याची चिंता निर्माण झाली आहे.
Ladki Bahin Yojana: संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. योजनेतील सर्व महिलांना KYC अनिवार्य करण्यात आले आहे, आणि त्यासाठीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे. परंतु अजूनही 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांचे KYC बाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाखो महिलांना योजनेचा लाभ बंद होणार का, अशी चिंता वाढली आहे.
25
KYC पूर्ण न केल्यास ₹1500 मिळणार नाही?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 2.5 कोटी महिलांना ₹1500 ची आर्थिक मदत दिली जाते. परंतु नियमांनुसार सर्व लाभार्थ्यांनी KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. सरकारने 18 नोव्हेंबर ही KYC साठी शेवटची तारीख जाहीर केली आहे. तथापि, अंतिम मुदत जवळ आल्यावरही 1 कोटी महिलांचे KYC शिल्लक असल्यामुळे अनेकांना सहाय्य रक्कम बंद होण्याची भीती वाटू लागली आहे.
35
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू झालेली योजना
महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला आता दीड वर्ष पूर्ण झाले आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या ₹1500 मदतीचा लाखो कुटुंबांना दिलासा मिळतोय. मात्र आता KYC अनिवार्य झाल्याने सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
KYC करण्यासाठी आता फक्त काहीच तास उरले आहेत. एवढ्या कमी वेळात 1 कोटी लाभार्थ्यांचे KYC पूर्ण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच अनेकांकडून मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
55
दर दिवशी 5 लाख महिलांचे KYC होत असल्याचा दावा
मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत दररोज सुमारे 5 लाख महिलांचे KYC पूर्ण होत आहे. आजपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अजूनही कोट्यवधी महिलांची KYC प्रक्रिया बाकी आहे. जर त्यांनी वेळेत KYC केले नाही, तर त्यांना पुढील महिन्यापासून योजनेचा लाभ मिळणार नाही.