कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाचा थरार! महिलांसह भाविकांना धडक; जमावाकडून कपडे फाटेपर्यंत चोप

Published : Jun 11, 2025, 09:45 AM IST
Kolhapur

सार

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीला जमावाने कपडे फाटेपर्यंत चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर, वन वे मार्गावरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या चालकाने रस्त्यामधील काही दुचाकींना धडक दिली. यामुळे दुचाकींचे मोठे नुकसान झाले. 

Kolhapur News : कोल्हापूर शहरात महाद्वार रोडवर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मद्यधुंद कारचालकाने (Kolhapur Drunk Driver Accident) भर रस्त्यात गोंधळ घालत अनेक महिलांसह भाविकांना जोरदार धडक दिली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वन वे मार्गावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या या चालकाने काही दुचाकींनाही धडक दिली. नेहमीच गजबजलेला असलेल्या महाद्वार रोडवर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तत्काळ पाठलाग करत मद्यधुंद कारचालकाला पकडले. संतप्त जमावाने या चालकाला अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशीअंती समजले की, आरोपी सांगली येथील असून त्याचे नाव प्रसाद दत्तात्रय सुतार आहे. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक