पोलंडमध्येही मला महाराष्ट्राचे दर्शन, PM मोदींनी जळगावात सांगितला किस्सा

Published : Aug 25, 2024, 02:08 PM ISTUpdated : Aug 25, 2024, 02:13 PM IST
pm modi

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगावात लखपती दीदी कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि लखपती दीदींना शुभेच्छा दिल्या. तसेच, नेपाळमधील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहिली.

जळगाव: तुमच्या सर्वांमध्ये मला महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्काराचे दर्शन होते. महाराष्ट्राचे हे संस्कार भारतच नाही तर जगात गेले आहेत. मी कालही विदेशी दौऱ्याहून आलो. मी यूरोपातील देश पोलंडमध्ये गेलो होतो. तिथेही मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. महाराष्ट्राची संस्कृती, संस्काराचे दर्शन झाले. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा प्रचंड सन्मान करतात. तुम्ही येथे बसून त्याची कल्पना करू शकत नाही. तिथल्या राजधानीत एक कोल्हापूर मेमोरियल आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी बनवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाची केली सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगावात लखपती दीदी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते रविवारी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी म्हणाले की, माझी नजर जिथपर्यंत जाते तेथेपर्यंत आई-बहिणींचा महासागर दिसत आहे. हे दृश्य मनाला आनंद देणारे आहे.

 

 

लखपती दिदींना माझ्याकडून शुभेच्छा : पंतप्रधान मोदी

लखपती दिदीचे महासंमेलन होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो बचत गटांसाठी सहा हजार कोटीहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशातून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळेल. सर्वांना माझ्या शुभेच्छा

नेपाळमधील मृतांना वाहिली श्रद्धांजली

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्या मृतांना नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, नेपाळ दुर्घटनेत आपण जळगावमधील अनेक सहकाऱ्यांना गमावले आहे. मी या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ही दुर्घटना झाल्यावर भारत सरकारने नेपाळ सरकारशी संपर्क साधला. आपण रक्षा खडसे यांना लगेच नेपाळला पाठवलं. जे लोक राहिले नाहीत, त्यांच्या पार्थिवांना आपण वायूसेनेच्या विमानाने आणलं. जे जखमी आहेत, त्यांच्यावर चांगले उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत एक कोटी दीदी लखपती झाल्या आहेत. रविवारी आज 11 लाख दीदींना लखपतीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. लवकरच एकूण 3 कोटी दिदी लखपती बनणार आहे.

आणखी वाचा : 

शेतकरी इंधन उत्पादक?, गडकरींनी शेतकऱ्यांना सांगितले 'श्रीमंत' होण्याचे सूत्र!

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती