जमीन दुसऱ्याच्या ताब्यात गेली? काळजी करू नका! नियम काय सांगतो आणि ती परत कशी मिळवता येते?

Published : Nov 23, 2025, 06:17 PM IST

How To Reclaim Land Ownership: जमीन चुकीच्या व्यक्तीच्या ताब्यात गेल्यास ती कायमची गमावली जात नाही. सातबारा दुरुस्ती, अतिक्रमणाची तक्रार, वारसाहक्कासाठी कलम ८० अंतर्गत दाद मागणे यांसारख्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून जमीन परत मिळवणे शक्य. 

PREV
16
जमीन दुसऱ्याच्या ताब्यात गेली? काळजी नको!

ग्रामीण भागात वारसाहक्कातील गोंधळ, खरेदी-विक्रीतील चुका, मोजणीतील फरक किंवा काही वेळा थेट गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांची जमीन चुकीच्या व्यक्तीच्या ताब्यात जाण्याची प्रकरणे वाढत आहेत. शेजारील जमिनीतील चुकीची मोजणी, दस्तातील चुकीचे तपशील किंवा अनधिकृत कब्जा यामुळे मूळ धारकाला मोठे नुकसान सहन करावे लागते.

परंतु जमीन एकदा दुसऱ्याच्या नावे गेली की ती कायमची गमावली जाते, असा समज चुकीचा आहे. कायद्याने ठरवलेल्या पद्धतीने कारवाई केल्यास जमीन पुन्हा आपल्या नावे मागवणे शक्य आहे. 

26
जमीन परत मिळवण्याची कायदेशीर प्रक्रिया

१. सातबारा आणि फेरफार नोंदींची तपासणी – पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल

जमिनीच्या मालकीमध्ये झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी सातबारा (7/12) आणि फेरफार नोंदी तपासणे आवश्यक आहे.

जर सातबाऱ्यावर चुकीचे नाव नोंदवलेले आढळले तर

तहसील कार्यालयात फेरफार दुरुस्तीचा अर्ज करावा

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी

नोंदणीकृत खरेदीखत

वारस प्रमाणपत्र

मोजणी नकाशा

जुने जमीन रेकॉर्ड

महसूल अधिकारी सुनावणी घेऊन पुरावे पडताळतात आणि ते योग्य असल्यास जमीन पुन्हा मूळ धारकाच्या नावे नोंदवतात. 

36
२. चुकीचा कब्जा किंवा अतिक्रमण असल्यास काय करावे?

जर जमिनीवर दुसऱ्याने अवैधरित्या कब्जा घेतला असेल तर

प्रथम अतिक्रमण नोंदविण्याची मागणी करावी

तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार प्रत्यक्ष जागेची पाहणी करतात

जागेचा चुकीचा वापर किंवा अतिक्रमण सिद्ध झाल्यास तहसीलदाराला तो हटविण्याचा अधिकार आहे

यानंतर जमीन पुन्हा मूळ मालकाच्या ताब्यात दिली जाते. 

46
३. जमीन-वाटणी किंवा वारसाहक्कातील वाद – उपाय कलम 80

अशा प्रकरणांमध्ये उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्याकडे कलम 80 अंतर्गत दाद मागता येते.

दोन्ही पक्षांचे पुरावे तपासून SDO अंतिम निर्णय देतात आणि योग्य व्यक्तीच्या नावे जमीन नोंदवली जाते. 

56
४. दस्त नोंदणीकृत असूनही सातबाऱ्यावर फेरफार न झाल्यास – नवीन शासन आदेश

काही प्रकरणांमध्ये खरेदी-विक्रीचा दस्त नोंदणीकृत असतो, परंतु फेरफार नोंदी (Mutation) सातबाऱ्यावर झालेल्या नसतात.

महसूल विभागाच्या नव्या आदेशानुसार

१५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४

या कालावधीत झालेले व्यवहार विशेष सवलतीस पात्र आहेत.

याअंतर्गत

पूर्वी अवैध मानून रद्द झालेले फेरफार पुन्हा नोंदवता येतील

सातबाऱ्यावर मूळ धारकाचे नाव पुन्हा नमूद केले जाऊ शकते 

66
जमीन चुकीच्या नावे गेली किंवा दुसऱ्याने ताब्यात घेतली, तरी ती परत मिळवणे शक्य आहे.

योग्य कागदपत्रे

वेळेवर अर्ज

महसूल अधिकाऱ्यांच्या प्रक्रियेचे पालन

हे तिन्ही टप्पे पाळल्यास जमीन पुन्हा आपल्या नावे परत मिळू शकते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories