पोरा मला ठळक दिसायला लागलं, आजीचा व्हिडीओ पाहून डोळ्यातून वाहतील गंगा जमुना

Published : Nov 21, 2025, 08:47 PM IST

एका वृद्ध आजीने पै-पै जमवून चष्मा खरेदी केला. दुकानदाराने तिची अडचण समजून घेत तिला नंतर पैसे देण्यास सांगितले, ज्यावर आजीने 'पोरा मला आता ठळक दिसायला लागलं' अशी दिलेली प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. 

PREV
16
पोरा मला ठळक दिसायला लागलं, आजीचा व्हिडीओ पाहून डोळ्यातून वाहतील गंगा जमुना

सध्याच्या काळात माणसं माणुसकी विसरत चालली आहेत. अशावेळी एखाद्या व्यक्तीला मदत हवी असेल तर तिथं मात्र हात आखडता घेतला जातो. पण इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ व्हायरल झाला.

26
आजीनं पै पै करून आणले होते पैसे

आजीनं पै पै करून आणलेल्या पैशांमधून चष्मा खरेदी केला आहे. सुट्या पैशांचा उभारला डोंगर आजी चष्मा घ्यायला आल्यानंतर तरुणापुढं आजीनं सुट्या पैशांचा डोंगर उभा केला. यावेळी दुकानदाराला नेमकं काय करावं ते समजत नव्हतं.

36
सुट्या पैशांचा उभारला डोंगर

यावेळी दुकानदारानं लै पैसे दिले असं म्हटलं. त्यानंतर त्यानं कॉइन मोजून म्हणजेच १० आणि ५ चे कॉइन मोजले आणि उरलेले आजीला देऊन टाकले. त्यानंतर आजीनं मी उद्या येऊन पैसे देते असं सांगितलं.

46
नंतर पैसे द्या असं म्हणून दुकानदारानं दाखवली माणुसकी

तुम्ही नंतर येऊन पैसे द्या असं म्हणून यावेळी दुकानदारानं माणुसकी दाखवली. त्यानंतर आजीनं चष्मा घेऊन निघायला लागली. माझ्या डोळ्याला आधी लै त्रास व्हायचं असं आजीनं म्हटल्यावर दुकानदारानं आता कस दिसतंय असं विचारलं.

56
पोरा मला ठळक दिसायला लागलं रं

त्यावर आजीनं आता ठळक दिसतंय असं म्हणून उत्तर दिल. दुकानदाराचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर त्याला चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

66
दुकानदार देव माणूस म्हणून आली कमेंट

दुकानदार देव माणूस म्हणून अशी एका युझरने कमेंट केली आहे. अशा स्वभावाचे दुकानदार असल्यावर गरिबांना गरज असेल त्यावेळेस एखादी गोष्ट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read more Photos on

Recommended Stories