Eknath Khadse : हनीट्रॅप प्रकरणात नवा ट्विस्ट! एकनाथ खडसेंचे प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांवर थेट आरोप, वाचा A ते Z खुलासे

Published : Jul 21, 2025, 07:50 PM IST
Eknath khadse

सार

Eknath Khadse : भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक झाल्यानंतर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. खडसेंनी एसआयटीमार्फत तपासाची मागणी केली आहे.

जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनीट्रॅप प्रकरणात आता नवे वळण आले आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक झाल्यानंतर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी थेट टीका करत धक्कादायक आरोपांची मालिका उघड केली आहे. खडसेंनी लोढाच्या संपत्तीपासून ते महाजनांशी असलेल्या संबंधांपर्यंत अनेक बाबींवर प्रकाश टाकत, या प्रकरणाच्या एसआयटीमार्फत तपासाची जोरदार मागणी केली आहे.

प्रफुल्ल लोढा, सामान्य कार्यकर्त्यापासून कोटींचा मालक कसा झाला?

एकनाथ खडसे म्हणाले, “सात-आठ वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढा हा एक सामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कार्यकर्ता होता. त्यानंतर त्याचे गिरीश महाजन यांच्याशी जवळचे संबंध झाले आणि काही वर्षांत तो 50-60 कोटींच्या संपत्तीचा मालक बनला. त्यांनी एकत्र बराच काळ काम केलं, राहत होतेही एकत्र. पण नंतर त्यांच्यात तणाव निर्माण झाला आणि लोढाने महाजनांविरोधात अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरायला सुरुवात केली. याचे व्हिडीओ आणि रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत.”

‘एक बटण दाबलं की सगळं बाहेर येईल’, लोढाचे धमकीजनक व्हिडीओ

खडसे पुढे म्हणाले, “प्रफुल्ल लोढाने पोलीस ठाण्यात धमक्यांची तक्रार दाखल केली होती. त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये तो म्हणतो. ‘ब्लॅकमेल करू नका, एक बटण दाबलं की सगळं बाहेर येईल. तुम्ही ट्रायडेंट हॉटेलला काय केलं हे मी सर्वांनाच सांगेन.’ यावरून यामध्ये गंभीर राजकीय घडामोडी दडल्या असल्याचे स्पष्ट होते.”

दुरावा असूनही भाजपमध्ये ‘पेढा भरवून’ प्रवेश?

खडसेंनी उपस्थित प्रश्न असा होता की, “ज्याच्याविरोधात एवढे व्हिडीओ आहेत, तोच व्यक्ती भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा प्रवेश कसा मिळवतो? गिरीश महाजन त्याला स्वतः पेढा भरवतात. एवढी संपत्ती त्याने कशी मिळवली? याचा तपास होणं आवश्यक आहे.”

अत्याचार आणि हनीट्रॅपचे गंभीर आरोप

प्रफुल्ल लोढावर अंधेरी आणि साकीनाका पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत.

1. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार (POCSO कायद्यांतर्गत)

2. अश्लील फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग

यापैकी दुसऱ्या प्रकरणात त्याला अटक झाली असून, सध्या तो जामीनासाठी प्रयत्न करत आहे. अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला जाणं हेच धक्कादायक आहे, असं खडसे म्हणाले.

ठाकरे सरकारकडूनही चौकशी, आता पुन्हा रेड

खडसे यांनी उघड केलं की, “ठाकरे सरकारच्या काळातही प्रफुल्ल लोढावर संशय होता आणि त्याच्या घरावर छापे टाकले गेले होते. नुकतेच 15 दिवसांपूर्वी पुन्हा पोलिसांनी रेड केली. यात कोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग आहे, याचा उलगडा होणं आवश्यक आहे.”

"एसआयटी स्थापन करा, खोलात जाऊन चौकशी करा"; खडसेंची फडणवीसांना विनंती

“ही प्रकरणं फक्त 72 अधिकाऱ्यांपुरती मर्यादित नाहीत. यात राजकीय गुंतवणूकही आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असून महिलांशी संबंधित, अश्लील स्वरूपाच्या प्रकरणात ते नक्की खोलात जाऊन तपास करतील, अशी माझी अपेक्षा आहे. म्हणूनच या प्रकरणाच्या खोलवर चौकशीसाठी एसआयटीची स्थापना झाली पाहिजे,” अशी मागणी खडसेंनी केली.

"माझ्याकडे माहिती आहे, पण पुरावा नाही"

“माझ्या माहितीनुसार प्रकरणात आणखी मोठी नावे सामील असू शकतात. मी दाव्यानिशी सांगू शकत नाही, पण पोलिसांनी सखोल तपास केला तर धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात हे समोर येईल,” असं सूचक वक्तव्य खडसेंनी शेवटी केलं.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!
कुळाची जमीन खरेदीची किंमत कशी ठरते? जाणून घ्या कायदा नेमकं काय सांगतो