
भारतीय हवामान विभागाने राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धरणशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी म्हणून काळजी घेण्याचं अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये गडगडाटासह पाऊस पडणार असून या ठिकाणी (40–60 किमी/तास) वेगाने वारे वाहणार आहे
IMD ने ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ओरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये काही ठिकाणी जास्त प्रमाणात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच पुण्याच्या घाट भागासाठी रेड अलर्टसुद्धा जारी करण्यात आला आहे. त्यामुळं पुण्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.
या पावसामुळे काही ठिकाणी लो-लाईंग एरियात पाणी साचण्याची शक्यता आहे, रस्ते बंद पडू शकतात आणि जल व्यवस्थापनावर ताण येऊ शकतो. ही स्थिती शहरांतील लोकजीवन व आपत्कालीन सेवा यावर परिणाम करू शकते. तसेच, आव्हानात्मक हवामानामुळे झाडांची पडझड, विजेचे फटका आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे
स्थानिक प्रशासनाने शहरातील ड्रेनेजचे भाग स्वच्छ करण्याचं अवाहन केलं असून पाणी तुंबणार नाही ना याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. तसेच नागरिकांना, खासकरून कोकण किनाऱ्यांवरील मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. घराच्या बाहेर जाताना हवामान विभागाचा अंदाज घेऊनच आवश्यक असेल तर जावं असं सांगण्यात आलं आहे.