Ketan Agrawal Case : Pune Ketan Agarwal l केतनला कट करुन संपवल्याचा शोध असा लागला

Published : Jun 24, 2026, 11:29 AM IST
Ketan Agrawal Case

सार

Ketan Agrawal Case : लोहगडावरील केतन अग्रवाल याच्या मृत्यूप्रकरणाला एक नवे वळण लागले आहे. पोलीस तपासातून सातत्याने धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच केतनची कशाप्रकारे हत्या करण्यात आली याचा उलगडा आता हळूहळू होत आहे.

Ketan Agarwal Case : पुण्यातील लोहगडावरुन खाली पडलेल्या केतन अग्रवालचे प्रकरण सध्या तापले आहे. सुरुवातीला केतनचा अपघाती मृत्यू झाल्याचे मानले गेले. पण जून महिन्यातील तापमानात हूडी घालून फिरणाऱ्या मिस्ट्री बॉयमुळे पोलिसांच्या तपासाला अधिक वेग आला. यानंतर आता केतनच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्सच्या मदतीने पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहेत.

उकाड्यात हूडी घातलेल्या व्यक्तीमुळे संशय

18 जूनला लोहगड किल्ल्यावरील प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये केतन अग्रवाल आणि सिया गोयल एकत्रित दिसले. पण या दोघांच्या मागून एक व्यक्ती हूडी आणि शॉर्ट्स घालून फिरताना आढळली. चेहरा स्पष्टपणे दिसू नये म्हणून हूडी खाली ओढली होती. हेडसेटही घातले होते. सदर व्यक्ती चेतन चौधरी असल्याचे नंतर तपासातून समोर आले. खरंतर, 33 अंश सेल्सियसच्या तापमानात हूडी घालून फिरणाऱ्या व्यक्तीवरील संशय अधिक बळावला गेला होता.

CCTV आणि डिजिटल पुराव्यांमधून खुलासा

पोलिसांनी तपासावेळी तचेतन चौधरीने किती वेळा मोबाइलचा वापर केला, इंटरनेट कधी बंद ठेवले आणि कॉल रेकॉर्ड्सही तपासले. यामध्ये सिया गोयल आणि चेतन यांच्यामध्ये हजारो फोन कॉल्स झाल्याचे समोर आले. अनेकदा दोघांमध्ये संवाद देखील झाला होता. सोशल मीडियावरील फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज यांची तुलना केली. यानंतर चेतनवर अधिक लक्ष दिले गेले.

साप दिसल्याचा बहाणा

14 जूनला सियाने केतनला पहिल्यांदा लोहगडावर नेले. त्यावेळी साप दिसल्याचा बहाणा करत केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. पण केतन झुडूपांमुळे बचावला गेला. यावेळी केतनला आपण वाचवले असा आभास सियाने तयार केला. पण पुन्हा 18 जूनला लोहगडावर नेले. यावेळी चेतन आणि सिया या दोघांनी मिळून थंड डोक्याने केतनचा काटा काढण्यासाठी दरीत ढकलले. याबद्दल अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रेमसंबंध आणि लग्न टाळण्यासाठी कट?

केतन आणि सियाचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता. तर नोव्हेंबर महिन्यात उदयपूरमध्ये जंगी लग्नसोहळा पार पडणार होता. त्याआधीच केतनची हत्या करण्यात आली. खरंतर, सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचे अफेअर सुरू होते. कुटुंबाची बदनामी होईल म्हणून सियाने लग्नाला होकार दिला. अशातच केतन हा सियाच्या अफेअरमधला अडथळा ठरला. याच कारणास्तव सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनचा काटा काढण्यासाठी प्लॅन करत त्याची हत्या केली. सध्या चेतन आणि सिया या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सियाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल