महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 27 मे ला जाहीर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून येत्या 27 मे ला दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो.
सीबीएसईनं काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता. महाराष्ट्रात सीबीएसईच्या तुलनेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करतात. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.
दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं. या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील काही भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येतो. मुंबईसह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते.
आणखी वाचा :
Mumbai Water Cut: मुंबईत पाणीकपात जाहीर, 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार