महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागलेल्या आहेत. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत मोठी अपडेट दिली होती. दीपक केसरकर यांनी दहावीचा निकाल 27 मे पर्यंत जाहीर होईल, अशी माहिती दिली होती. बारावीचा निकाल ज्या प्रमाणं ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आलेला होता. तिचं पद्धत दहावीच्या निकालासाठी वापरली जाते. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी बारावी आणि दहावीचा निकाल प्रथम ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जातो आणि काही दिवसांनतर निकालाची छापील प्रत विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महाविद्यालयात उपलब्ध होईल.
बोर्ड निकाल कुठं जाहीर करणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाईल. महाराष्ट्र बोर्डाकडून निकाल ज्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार त्याची संभाव्य यादी पुढील प्रमाणं
संकेतस्थळ
1. mahresult.nic.in
2. www.mahahsscboard.in
3. https://results.digilocker.gov.in
4. http://results.targetpublications.org
दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल डिजीलॉकरमध्ये सेव्ह करुन ठेवता येईल. डिजीलॉकरमध्ये निकाल जतन करुन ठेवल्यास विद्यार्थ्यांना पुढं फायदा होऊ शकतो. दहावीच्या विद्यार्थ्यांना maharesult nic in यासह इतर वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल.
आणखी वाचा :