यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या लेकीला 100 टक्के गुण
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीला बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहे. रेणुका बोरमणीकर असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. देवगिरी महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. तर राज्यातील 8782 मुलांना 90 टक्के गुण मिळाले, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
निकाल जाहीर होताच वेबसाईट बंद
बारावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला आहे. मात्र बोर्डाने दिलेली mahresult.nic.in ही वेबसाईट पहिल्या मिनिटापासून डाऊन झाली. विद्यार्थी आणि पालकांनी बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटवर अक्षरश: उड्या घेतल्या. मात्र ही वेबसाईटच ओपन होत नसल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पाच मिनिटांनी ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली.