Maharashtra Weather Alert: दिवाळीला वादळी पावसाचा 'सरप्राईज'! महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तुमचा जिल्हा यादीत आहे का?

Published : Oct 20, 2025, 09:11 PM IST

Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने २१ ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला.

PREV
16
दिवाळीत वादळी पावसाची शक्यता!

मुंबई: दिवाळीच्या सणावर पावसाचं सावट पडलं असून, 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑक्टोबर हीटचा तडाखा अद्यापही कायम आहे आणि त्यातच या पावसाच्या आगमनामुळे राज्यात मिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे.

Thunderstorm accompanied with lightning, light rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa and South Madhya Maharashtra .

26
कोकण व मुंबई परिसर

मुंबई, ठाणे, पालघर – कोरडे वातावरण अपेक्षित, उकाडा कायम.

मुंबईचे तापमान: कमाल - 36°C, किमान - 25°C

रायगड, रत्नागिरी – ढगगडगडाटासह हलकासा ते मध्यम पाऊस.

सिंधुदुर्ग – विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता; यलो अलर्ट जारी. 

36
पश्चिम महाराष्ट्र

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर – ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस.

पुण्याचे तापमान: कमाल - 31°C, किमान - 20°C

सातारा घाटमाथा, कोल्हापूर परिसर – वादळी वारे, विजांसह पाऊस; यलो अलर्ट. 

46
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना – कोरडे वातावरण; उष्मा कायम.

छत्रपती संभाजीनगरचे तापमान: कमाल - 32°C, किमान - 20°C

परभणी, हिंगोली, नांदेड – विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; यलो अलर्ट.

बीड, लातूर, धाराशिव – हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस. 

56
उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर – हलकासा पाऊस होण्याची शक्यता.

नाशिकचे तापमान: कमाल - 32°C, किमान - 21°C 

66
विदर्भ

अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया – विजा व वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; यलो अलर्ट.

नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ – कोरडे वातावरण कायम.

नागपूरचे तापमान: कमाल - 32°C, किमान - 22°C 

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories