सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन दाऊदी बोहरा समाजाचे नेते राहतील, मुंबई उच्च न्यायालयाने पुतण्याची याचिका फेटाळली

न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने हा खटला फेटाळून लावला आणि सांगितले की, न्यायालयाने आपला निकाल केवळ पुराव्याच्या आधारावर दिला आहे,आस्थेवर नाही.त्यामुळे सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन दाऊदी बोहरा समाजाचे नेते राहतील. 

दाऊदी बोहरा समाजाच्या नेत्याच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 2014 पासून सुरू असलेला खटला फेटाळण्यात आला आहे. आता सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन हे दाऊदी बोहरा समाजाचे नेते राहतील. खरे तर त्यांचे पुतणे सय्यदना ताहेर फखरुद्दीन यांनी त्यांच्या नेतृत्वाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने हा खटला फेटाळून लावला आणि सांगितले की, न्यायालयाने आपला निकाल केवळ पुराव्याच्या आधारावर दिला आहे, विश्वासावर नाही.

नेमकं प्रकरण काय होतं?

२०१४ पासून असलेला बोहरी समाजाचा उत्तराधिकारी प्रकरणाचा वाद आज मुंबई उच्च न्यायालयाने यावर अंतिम सुनावणी करत याचिका फेटाळली आहे. दाऊदी बोहरा समाजाच्या उत्तराधिकारी पदाचा वाद गेल्या १० वर्षांपासून सुरु आहे. २०१४ साली ५२वे सय्यदना मोहम्मद बुऱ्हाणुद्दीन यांचं निधन झालं.आणि या नंतर त्यांचे पुत्र मुफद्दल सैफुद्दीन हे मोहम्मद बुऱ्हाणुद्दीन यांचे वारस म्हणून ५३वे सय्यदना झाले. मात्र, सय्यदना बुऱ्हाणुद्दीन यांचे सावत्र बंधू खुझैमा कुतुबुद्दीन यांनी मुफद्दल सैफुद्दीन यांची वारस म्हणून नियुक्ती करण्यावर आक्षेप घेतला.सय्यदना बुऱ्हाणुद्दीन यांनी आपल्याला उत्तराधिकारीम्हून नियुक्त केलं होतं असा दावा खुझैमा कुतुबुद्दीन यांनी केला. मात्र पुराव्यांअभावी आज उच्च नायायालयाने याचिका फेटाळली आहे.

गुप्त उत्तराधिकारी घोषित केल्याचा एकही साक्षीदार नाही :

सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी खटल्याला विरोध केला. ते म्हणाले की कथित गुप्त उत्तराधिकारी करताना कोणतेही साक्षीदार नव्हते आणि ते स्वीकारले जाऊ शकत नाही.

देशात मोठ्या संख्येने बोहरी समाज :

दाऊदी बोहरा हा शिया मुस्लिमांचा धार्मिक पंथ आहे. पारंपारिकपणे व्यापारी आणि उद्योजकांचा समुदाय. दाऊदी बोहराचे भारतात 5 लाखांहून अधिक सदस्य आहेत आणि जगभरात 10 लाखांहून अधिक सदस्य आहेत. समुदायाचे सर्वोच्च धार्मिक नेता दाई-अल-मुतलक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या श्रद्धेनुसार उत्तराधिकारी नियुक्ती दैवी प्रेरणेने केली जाते. उत्तराधिकारी पद नास समाजातील कोणत्याही पात्र सदस्याला दिला जाऊ शकतो. केवळ वर्तमान दाईच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दिला जातो असे नाही.

Share this article