काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी घेतली अजित पवारांची भेट, पक्षप्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण

Published : May 19, 2025, 10:20 AM IST
datta bahirat

सार

काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या जात आहेत. याशिवाय बहिरट आठवड्याभरात अजित पवारांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Maharashtra : काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि शिवाजीनगर येथील विधानसभेचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. खरंतर, सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच बहिरट यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने पक्षप्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आले आहे. दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांची जुळवाजुळव करण्यास सुरू केली आहे. यामुळे पुणे येथे महायुती होणार का अशा देखील चर्चा रंगत आहेत.

याआधी बहिरट यांनी दोनदा शिवाजीनगर येथून विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या बाजूने लढवली आहे. यामध्ये त्यांचा पराभव झाला. पण शिवाजीगर गावठण येथून महिलापालिकेसाठी निवडून आले होते. बहिरट यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर येत्या काळातील राजकीय वाटचालीबद्दल चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केलाय. काँग्रेसचे आणखी काही माजी नगरसेवक महायुतीच्या संपर्कात आहेत. बहिरट आठवड्याभरात अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
कौटुंबिक वाद टाळून जमीन-मालमत्तेची वाटणी कशी करावी? जाणून घ्या कायदेशीर हक्क आणि सोपे उपाय