एकनाथ शिंदे यांचे आमदार फुटणार? महाराष्ट्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

Published : Jun 07, 2024, 12:36 PM ISTUpdated : Jun 07, 2024, 12:37 PM IST
CM Eknath Shinde

सार

नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील राजकरणात मोठ्या हालचाली झाल्याचे दिसून आले. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पाच ते सहा आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics Update : लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकरण तापले आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सरकारमधून मुक्त करण्यासाठी दिल्लीत जाऊन अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदीची भेट घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सूत्रांनुसार, लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि निकालानंतर शिंदे गटातील पाच ते सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. अशातच विधानसभा निवडणुकीआधीच शिंदे गटात फुट पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची देखील शक्यता आहे.

सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
सचिन अहिर यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. अहिर यांनी म्हटले की, शिंदे गटाचे सहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा आम्ही केलेला नाहीये. यामुळे आमदारांसोबत संपर्क ठेवायचा अथवा नाही ठेवायचा हा नंतरच भाग आहेय. पण येत्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही आमच्यामधीलच काहींना घेऊन निवडणूक लढवू असेही उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

लोकसभा निकालानंतर महायुतीमधील पक्षांमध्ये अस्थिरता
लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटच नव्हे अजित पवार आणि भाजपामध्ये देखील अस्थिरता आहे. अहिर पुढे म्हणाले की, आमच्यासोबत अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही. लोकसभेवेळी काहींनी संपर्क केला होता. त्यावेळी आमच्याच पक्षातील काहींना तिकीट द्यावी अशी मागणी केली होती. याशिवाय घरातील नव्हे आम्ही सांगू त्या माणसाला तिकीट द्यावे. त्यांना आम्ही आतून मदत करु असेही संपर्क करणारे म्हणाले होते. या गोष्टीला आम्ही नकार दिला होता.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने राज्यात 15 जागांवर निवडणूक लढवली होती. यापैकी केवळ सात जागांवर शिंदे गटाला विजय मिळाला. उर्वरित आठ जागांवर पराभव स्विकारावा लागला. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाने 21 जागा लढवल्या. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाला नऊ जागांवर विजय मिळाला आहे.

आणखी वाचा : 

बारामतीतील पराभवावर अजित पवार यांनी व्यक्त केले प्रश्नचिन्ह, आमदार आपल्यासोबत असल्याची दिली ग्वाही

पारनेरमध्ये खासदार लंके-विखे समर्थकांचा राडा, लंके समर्थक झावरेंवर प्राणघातक हल्ला

PREV

Recommended Stories

Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात