मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत 2 ठार

Published : Jun 06, 2024, 03:44 PM IST
accident 0.jpg

सार

अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत. 

अकोला-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत. आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. अकोला खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर भेगा पडल्यात. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीचे चाक या भेगांमधून गेले आणि अडकलं. त्यानंतर दुचाकी स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झालाय, तर दुसऱ्या व्यक्तिला देखील अपघातात जीव गमवावा लागला आहे. सचिन जुनारे आणि शाम महल्ले असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू

घटनेची माहिती मिळताच वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठत, महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघाताप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!