
Pimpri- Chinchwad Traffic Advisory : पिंपरी-चिंचवडमधील चिंचवडगाव येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव एकत्र येणार आहेत. यामुळे संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. चापेकर चौक येथील ईदगाह मैदान परिसरात काही प्रमुख रस्ते तात्पुरते बंद करण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी (चंद्रदर्शनानुसार बदल होऊ शकतो) पहाटे 5 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चापेकर चौक परिसरातील प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. या कालावधीत केवळ रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना परवानगी दिली जाईल.
या सर्व मार्गांवर वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
नमाज पठण शांततेत पार पडावे आणि शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी हे नियोजन केले आहे. नागरिकांनी या बदलांची दखल घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.