मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी येथे महामानवाला केले अभिवादन

Published : Dec 06, 2024, 11:35 AM ISTUpdated : Dec 06, 2024, 12:36 PM IST
CM Devendra Fadanvis at Chaitya Bhumi

सार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर अभिवादन केले. देशभरातून लाखो अनुयायी दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे देखील उपस्थित होते.

फडणवीसांनी संविधानाचे सांगितले महत्व

अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपला देश वेगाने प्रगती करतोय. आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर भारत आहे. याचे सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं, त्याचं आहे. कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन तयार करण्यात आलं असल्याचेही फडणवीस म्हणाले.

देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल होत आहेत. तर काल पासून अनुयायी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अस्थीकलश आणि प्रतिमेस अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेणार आहेत.

आणखी वाचा:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सही वैद्यकीय सहायता निधीच्या फाईलवर

महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्व : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक