उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात, बसची ट्रकला धडक बसल्याने 3 जणांचा मृत्यू

Published : May 12, 2025, 10:13 AM ISTUpdated : May 12, 2025, 10:16 AM IST
Tourist Bus accident that killed three student in Mattupetti Arrest of driver to be recorded today

सार

उज्जैनला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका खासगी बसला भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.

Accident News : उज्जैनला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका खासगी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. सदर घटना रविवारी पहाटे 2.30 वाजता फलटणमधील सालपे गावातील बिरोबा मंदिराजवळ घडली. खरंतर, ट्रकला बसची जोरात धडक बसल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

मृत व्यक्तीची नावे सलमान इम्तियाज सय्यद, रजनी संजय दुर्गुळे अशी आहेत. तर तिसऱ्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत चालकाचाही मृत्यू झाला आहे.

नक्की काय घडले?

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथून भाविकांना घेऊन निघालेली खासगी बस उज्जैनला देवदर्शनासाठी जाणार होती. बस वाठार स्थानकातून सालपे घाटातून लोणंदच्या दिशेने वळली. याच वेळी समोर आलेल्या ट्रकला बसची धडक बसली गेली आणि अपघात झाला

अपघातानंतर तातडीने सालपे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले.याशिवाय लोणंद पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचत बचाव कार्य सुरू केले. सर्व जखमींना लोणंदमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी सदर घटनेचा गुन्हा दाखल केले असून पुढील तपास करत आहेत.

PREV

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!