भाजपा नेते रामराव वडकुते यांचे निधन, ८ महिन्यांपूर्वीच घेतली होती खासदारकीची शपथ

vivek panmand   | CMS
Published : Nov 22, 2026, 10:16 AM IST
ramrao vadkute

सार

राज्यसभा खासदार आणि धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना छातीत दुखत असल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठ महिन्यांपूर्वीच ते भाजपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

विदर्भवासीयांसाठी आजची सकाळ एक दुःखद बातमी घेऊन आली. राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झालं आहे. त्यांना छातीत दुखायचा त्रास सुरु झाल्यावर एम्स दिल्ली या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार सुरु असतानाच त्यांचं दुःखद निधन झालं आहे.

आठ महिन्यांपूर्वीच झाले होते खासदार 

आठ महिन्यांपूर्वीच वडकुते हे भाजपकडून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. धनगर समाजाचे नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जात होत. त्यांनी हिंगोली लोकसभेचे प्रभारी म्हणून काम पाहिलं होत. त्यांना २००४ साली राष्ट्रवादी पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली होती. महामंडळावर असताना राज्यमंत्रिपदाचा दर्जा त्यांना मिळाला होता. खासदारकीचा कालावधी वडकुते यांना पूर्ण करता आला नाही.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Tipu Sultan Controversy : राष्ट्रवादीच्या टिपू सुलतानवरील विधानावर शिवसेनेची टीका
Supriya Sule : बारामती विमानतळासाठी 64 कोटी मंजूर, सुप्रिया सुळेंनी केले स्वागत