मुंडे यांच्या समर्थकाचा अपघाती मृत्यू, माजी आमदार आर. टी. देशमुख काळाच्या अडद्याआड

Published : May 26, 2025, 06:54 PM ISTUpdated : May 26, 2025, 07:39 PM IST
beed accident

सार

तुळजापूर ते औसा मार्गावर लातूर जिल्ह्यातील बेलकुंड उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला. त्यांच्या वाहनाचा वेग अधिक असल्याने कार थेट सुरक्षा कठडा तोडून खाली कोसळली आणि चार वेळा पलटी झाली.

बीड : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे आज सकाळी एका भीषण अपघातात निधन झाले. तुळजापूर ते औसा मार्गावर लातूर जिल्ह्यातील बेलकुंड उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला. त्यांच्या वाहनाचा वेग अधिक असल्याने कार थेट सुरक्षा कठडा तोडून खाली कोसळली आणि चार वेळा पलटी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना तातडीने लातूरच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक

आर. टी. देशमुख हे भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. प्रत्येक दसरा मेळाव्यात ते उपस्थित असत. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर अनुयायी असलेल्या देशमुख यांनी माजलगावमध्ये भाजपची पकड वाढवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केलं होतं. त्यांच्या जाण्याने बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताची प्राथमिक माहिती काय सांगते?

स्थळ: राष्ट्रीय महामार्ग 361, बेलकुंड उड्डाणपुलाजवळ

कारण: रस्त्यावर पाणी साचल्याने गाडी घसरली

घडलेली घटना: सुरक्षा कठडा तोडून गाडी चार वेळा उलटली

गंभीर इजा: देशमुख यांना डोक्याला आणि छातीला गंभीर मार

वाहनचालक: देशमुख यांचा बॉडीगार्ड वाहन चालवत होता

वेग: गाडीचा वेग अधिक असल्याने नियंत्रण सुटल्याची शक्यता

राजकीय वर्तुळात शोककळा

आर. टी. देशमुख यांच्या अपघाती निधनाने राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दु:ख व्यक्त केलं जात आहे. बीडमधील भाजप कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत लिहिलं की, "माझे खंदे समर्थक आणि पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला आहे. आर. टी. देशमुख यांची भरपाई कधीच होऊ शकत नाही."

देशमुख यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या माजलगाव येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार असून, उद्या शोकसभेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक