भीमा कोरेगाव प्रकरणात चौकशीसाठी शरद पवार आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता

Published : May 13, 2025, 01:45 PM ISTUpdated : May 13, 2025, 01:46 PM IST
Sharad Pawar

सार

शरद पवार भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणात आज आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता आहे. 

Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव दंगलीच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते. या पत्रामध्ये दंगल घडवून आणल्याचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. अशातच शरद पवार आज (13 मे) आयोगासमोर हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आयोगाने शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आणि संबंधित कागदपत्रे 30 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे लेखी निर्देश दिले होते. याबद्दलची नोटीस देखील शरद पवारांना धाडण्यात आली होती. मात्र पवारांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. यामुळेच आयोगाने पुन्हा शरद पवारांना नोटीस धाडत 13 मे ला कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते.

पत्रात काय होते?

वर्ष 2020 मध्ये पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये असा आरोप लावण्यात आला होता की, भीमा कोरेगावमधील दंगल फडणवीस यांच्या सरकारच्या कटाचा परिणाम होता. दंगलीचे पुरावे पोलिसांकडून अर्धवट सादर करण्यात आले. सरकारने पोलिसांची मदत घेत कट रचला आणि जनतेला फसवले असा आरोप लावण्यात आला होता. यावरुन दंगलीची एसआयटी चौकशी करण्याी मागणी पत्राद्वारे पवार यांनी केली होती.

PREV

Recommended Stories

तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!