बीड पोलिसांकडून वाल्मिक कराडच्या समर्थकाच्या आणखी एका गँगवर मोक्का

Published : May 12, 2025, 11:46 AM ISTUpdated : May 17, 2025, 04:22 PM IST
Crime

सार

बीड पोलिसांकडून वाल्मिक कराडच्या समर्थकाच्या आणखी एका गँगवर मोक्का लावला आहे. खरंतर, फड गँग असे त्या गँगचे नाव आहे.

Maharashtra : गेल्या अनेक महिन्यांपासून बीडमध्ये गुन्ह्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. अशातच पाच महिन्यांमध्ये बीड पोलिसांकडून चार गँगवर मोक्काच्या अंतर्गत कारवाई केली. जानेवारी महिन्यात पोलिसांकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले गँगवर मोक्का लावला. यानंतर आठवले गँग, भोसले गँगवर करवाई केली. आता बीड पोलिसांनी वाल्मिक कराडचे समर्थ असणारी फड गँगवर कारवाई केली आङे.

दरम्यान, दोन वर्षांआधी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याच्याकडून 2 लाखांहून अधिक रक्कम काढून घेतली. यामुळेच परळीमधील रघुनाथ फड गँगवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकूण 7 जणांच्या विरोधात कारवाई केली असून अद्याप 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामधील चारजणांना जामीन मिळाला, एक आरोपी कारागृहात तर दोन जणांनी पळ काढला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!