Baramati Plane Crash : बारामती विमान अपघातात जळून खाक झालेल्या पाच जणांपैकी पिंकी माळी ही एअर होस्टेस एक होती. प्रवासाला निघण्यापूर्वी तिने वडिलांना शेवटचा कॉल केला होता. वडिलांसोबत झालेला तिचा शेवटचा संवाद आता समोर आला आहे.
बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील प्रमुख नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत फ्लाईट अटेंडंट पिंकी माली हिचाही जळून मृत्यू झाला.
26
वडिलांना शेवटचा कॉल करणारी पिंकी
मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी विमान टेक ऑफ होण्यापूर्वी पिंकी मालीने तिच्या वडिलांना फोन केला होता. 'पप्पा, आज मी अजित पवारांसोबत प्रवास करत आहे,' असं तिने आनंदाने सांगितलं. 'अजित पवारांना बारामतीत सोडून मी नांदेडला जाईन. बाकीचं उद्या सविस्तर बोलते,' असं पिंकीने वडिलांना सांगितलं होतं.
36
पुन्हा कॉल आलाच नाही, वडील शिवकुमार भावुक
पिंकी माळीचे वडील शिवकुमार यांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे. 'अजित पवारांसोबतच्या प्रवासाबद्दल ती खूप खूश होती. एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मलाही अभिमान वाटला होता. मी तिच्या फोनची वाट पाहत होतो, पण मला धक्काच बसला. माझी मुलगी ओळखही पटणार नाही इतकी जळाली आहे,' असं सांगताना शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले.
'फोन करते म्हणून सांगून गेलेली माझी मुलगी आता नाही. मला काहीच सुचत नाहीये. मी माझ्या लाडक्या मुलीला गमावलं आहे. विमानाचं काय झालं मला माहीत नाही, मला तांत्रिक ज्ञान नाही. माझ्या मुलीचा मृतदेह द्या. तिची ओळखही पटत नाहीये, अंत्यसंस्कार कसे करायचे?' असं म्हणत शिवकुमार यांनी टाहो फोडला.
56
मुंबईच्या वरळीत राहत होती पिंकी
पिंकी माली मुंबईतील वरळी येथे राहत होती. गेल्या पाच वर्षांपासून ती फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करत होती. आपल्या लहान भावाला पायलट बनवण्याचं तिचं स्वप्न होतं. तिला स्वतःला पायलट होता आलं नाही. फी भरण्याची तिची ऐपत नव्हती. पण भावाला पायलट करण्यासाठी ती आर्थिक मदत करत होती.
66
अपघातात पाच जणांचा मृत्यू
बारामती विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव, विमान कर्मचारी पिंकी माळी, पायलट शांभवी पाठक आणि सुमित कपूर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. विमान अपघाताचा तपास वेगाने सुरू आहे.
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.