
राज्यात अतिवृष्टीचा पाऊस होत असल्याचं दिसून येत आहे. काही भागात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची अजूनही संपलेली नाही. कोकण आणि घाटमाथ्यासह विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज कोकणासह काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगडसह, पुणे आणि सातारा या भागात पाऊस होणार आहे. त्यामुळं ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे.
नाशिक, घाटमाथा कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांसह वादळी पाऊस पडू शकतो. राज्यात काही ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.