बलात्काराच्या घटनेमध्ये डॉक्टरचं नाव गोवण्याचा प्रयत्न, छ. संभाजीनगरमधील प्रकार

Published : May 31, 2025, 02:46 PM IST
Eyewitnesses are CBI s big tool in RG Kar doctor rape and murder case know what she said bsm

सार

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नामांकित डॉक्टरला अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. डॉक्टरच्या ओळखीतील महिलेने कुटुंबियांसह मिळून हा कट रचला होता. पोलिसांनी तक्रार नोंदवून महिलेसह तिच्या कुटुंबियांना अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी एकीकडे डॉक्टर समाजासाठी देवदूत ठरत असतानाच, दुसरीकडे त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे प्रकारही उघड होत आहेत. अशाच एका प्रकारात, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका नामांकित डॉक्टरला अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक कट उघडकीस आला आहे. या प्रकरणात संपूर्ण कुटुंबच सहभागी असल्याची बाब समोर आली असून, डॉक्टरच्या प्रतिष्ठेला धक्का देण्यासाठी शिताफीने रचलेला जाळ पोलिसांनी फाडून टाकलं आहे.

काय आहे प्रकरण? डॉक्टरच्या ओळखीत आलेल्या एका महिलेनं त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, तिच्या कुटुंबियांनी ठरवून, डॉक्टरसोबतचा बनावटी अश्लील व्हिडीओ तयार केला आणि त्याच्या आधारे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण योजना पूर्वनियोजित होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. डॉक्टरने दाखवले धैर्य, पोलिसांकडे केली थेट तक्रार ब्लॅकमेलचा सामना करताना डॉक्टर घाबरले नाहीत. त्यांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत, संबंधित महिलेसह तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना अटक केली आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!