Amravati–Tirupati Express Update: तिरुपती बालाजी दर्शनासाठी लोकप्रिय असलेली अमरावती–तिरुपती एक्स्प्रेस (12766/12765) आता २९ जानेवारी २०२६ पर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादामुळे या सेवेला मुदतवाढ दिली आहे.
Amravati–Tirupati Express Update: तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीला लक्षात घेता सुरू करण्यात आलेली अमरावती–तिरुपती एक्स्प्रेस (12766/12765) अल्पावधीतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. सुरुवातीला मर्यादित कालावधीसाठी चालवण्यात आलेल्या या गाडीची मुदत आता संपली असली तरी प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने या सेवेला 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे भक्तांना आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
25
अमरावतीवरून सुटण्याची वेळ पूर्ववत
अमरावती, अकोला, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांतील प्रवासी या गाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अमरावती–तिरुपती एक्स्प्रेस (12766) आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार सकाळी 6.45 वाजता अमरावतीहून सुटते व 8.00 वाजता अकोल्यात पोहोचते. दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता गाडी तिरुपती स्थानकात दाखल होते.
35
परतीच्या प्रवासाची वेळ
तिरुपती–अमरावती एक्स्प्रेस (12765) मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 3.45 वाजता तिरुपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी 3.10 वाजता अमरावतीत पोहोचते.
काही काळ या गाडीचा प्रारंभ अकोला करण्यात आल्याने अमरावतीतील चाकरमानी, विद्यार्थी तसेच भाविकांना मोठी गैरसोय होत होती. मात्र, सततच्या मागणीमुळे मध्य रेल्वेने पुन्हा ही एक्स्प्रेस अमरावती येथूनच सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी तसेच तिरुपतीकडे जाणाऱ्यांसाठी सुविधा अधिक सुकर झाल्या आहेत.
55
भाविकांची पहिली पसंती ठरलेली सेवा
तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ही एक्स्प्रेस सर्वाधिक पसंत केली जाते. दर्शन आटोपल्यानंतर मंगळवार व शनिवारच्या दिवशी परतीची सोय उपलब्ध असल्याने भक्तांचा प्रवास अत्यंत सोयीस्कर ठरतो.