
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली अमोल बालवडकर यांची निवडणूक त्यांनी जिंकली आहे. त्यांनी भाजपच्या लहू बालवाडकर यांचा पराभव करून विजय संपादन केला. अंतिम वेळेला भाजपने तिकीट न दिल्यामुळं अमोल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आणि विजय संपादन केला. त्यांच्या विजयामुळं मंत्री चंद्रकांत पाटील यांची नाचक्की झाली आहे.
अमोल बालवडकर हे ६५० मतांनी जिंकले आहेत. भाजपकडून सातव्या, आठव्या आणि नवव्या फेरीची परत मोजणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने फक्त नवव्या फेरीची मतमोजणी करण्यात येईल असं सांगितलं होतं. अमोल बालवडकर यांनी भाजपच्या दिग्गज उमेदवारांवर टीका केल्यामुळं हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
अमोल बालवाडकर यांच्या पॅनलमधून अजून एका उमेदवाराचा विजय झाला आहे. बाबुराव चांदेरे यांनी विजय संपादन केला असून त्यांन चांगलं मताधिक्य मिळाल आहे. अमोल बालवडकर यांनी जनतेने न्याय दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी बोलताना भावनिक होऊन प्रतिक्रिया दिली. आम्ही आहे, तुम्ही लढा असं जनतेने म्हटल्याचे अमोल यांनी म्हटलं आहे.