BIG BREAKING : महाराष्ट्राच्या लाडक्या दादाची अकाली एक्झीट, अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू, अधिकृत घोषणा

Published : Jan 28, 2026, 09:36 AM ISTUpdated : Jan 28, 2026, 10:44 AM IST
Ajit Pawar Plane Crash in Baramati First Visuals Emerge

सार

Ajit Pawar Plane Crash in Baramati First Visuals Emerge : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा बुधवारी सकाळी बारामतीत लँडिंग करताना अपघात झाला. 

Ajit Pawar Plane Crash in Baramati First Visuals Emerge : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा आज बुधवारी सकाळी बारामतीत लँडिंग करताना अपघात झाला. विमानातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. सकाळी ९ ते ९.३० दरम्यान हा भीषण अपघात झाला. सध्या संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी आहे. अजित पवार आज बारामतीला दौर्यावर जात होते. केंद्रीय बजेट सेशन सुरु होणार असल्याने पवार कुटुंबीय सध्या दिल्लीला आहे. सर्व कुटुंब बारामतीकडे निघाल्याचे समजते. अपघातग्रस्त विमान व्हिएसआर एव्हिएशनचे असल्याचे समजते. अजित पवार यांच्या निधनाने बारामतीवर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक अशी मृतांची नावे आहेत.. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी घटनेची माहिती घेतली. 

खाजगी VSR कंपनीचे विमान

एकूण प्रवासी 05 

1. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव 

3. पायलट कॅप्टन सुमित कपूर 

4. कॅप्टन संभवी पाठक 

5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

मुंबई टेक ऑफ टाइमिंग सकाळी 08.10 hrs

बारामती लँडिंग 08.50 hrs

 

 

महाराष्ट्र हळहळला! राज्याच्या राजकारणातील एक असा नेता, ज्याच्या घड्याळाच्या काट्यावर अख्खं प्रशासन धावायचं. ज्यांच्या एका शब्दाला शब्दाचे वजन असायचे आणि ज्यांनी 'पहाटेची कामाची वेळ' ही आपली ओळख बनवली होती, त्या अजित दादांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. बारामतीच्या मातीत विमानाचा झालेला तो अपघात केवळ एका विमानाचा अपघात नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अकाली अस्त होता.

शिस्तीचा भोक्ता आणि कामाचा झपाटा

अजित पवार म्हणजे केवळ एक राजकीय नाव नव्हतं, तर ती एक कार्यपद्धती होती. पहाटे ५ वाजता कामाला सुरुवात करून प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणारा हा लोकनेता शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या कामासाठीच धावत होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना, आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते बारामतीकडे निघाले होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.

 

 

२८ जानेवारीचा तो दिवस बारामतीकरांसाठी कधीही न विसरता येणारा ठरला. विमान धावपट्टीवर उतरत असतानाच तांत्रिक बिघाड झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. विमानाचे झालेले तुकडे पाहूनच काळजात धस्स होत होतं. विमानातील सहाही जणांच्या मृत्यूची बातमी आली आणि 'दादा' आपल्याला सोडून गेल्याची पुष्टी झाली. बारामती हॉस्पिटलबाहेर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रू या नेत्याच्या लोकप्रियतेची साक्ष देत होते.

साडेचार दशकांचा वारसा संपला

गेल्या साडेचार दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव केंद्रस्थानी होतं. शरद पवार यांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय नेहमीच चर्चेत राहिले. स्पष्टवक्तेपणा आणि तडफदार कार्यशैली ही त्यांची दोन प्रमुख शस्त्रे होती. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहेच, पण राजकारणातील एका मोठ्या मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे.

आज जरी अजित दादा आपल्यात नसले, तरी त्यांनी प्रशासनात आणलेली शिस्त आणि विकासाची दृष्टी महाराष्ट्राला सदैव दिशा देत राहील.

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे कार्यक्रम

(बुधवार दि.२८ जानेवारी २०२६)

सकाळी १०.०० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत:

जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभा

बारामती तालुक्यातील

निरावागज (सकाळी १० वाजता),

पणदरे (दुपारी १२ वाजता),

करंजेपूल ( दुपारी ३ वाजता),

सुपा येथे (सायं.५.३० वाजता)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' आता होणार लखपती! हप्ता २१०० रुपये करणार; कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी गर्जना
पुणे पोलीस भरतीचा बिगुल वाजला! खाकी वर्दीचं स्वप्न होणार पूर्ण; 'या' तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात?