Ajit Pawar Death Plane Crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट; राज्य सरकारकडून CID चौकशीचे आदेश

Published : Jan 30, 2026, 12:30 PM IST
ajit pawar untold mission maharashtra 12th budget local body elections

सार

Ajit Pawar Death Plane Crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणात CID चौकशीचे आदेश देण्यात आले असून घटनास्थळ सील करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार धुके, कमी दृश्यमानता आणि ILS सुविधांचा अभाव हे अपघाताचे मुख्य कारण असू शकते. 

Ajit Pawar Death Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अशातच आता या भीषण विमान अपघाताच्या तपासाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून प्रकरणाची CID चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोक 

अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारो समर्थकांनी “अजित दादा अमर रहे” अशा घोषणा देत आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण निरोप दिला. त्यांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

CID चौकशीचे आदेश, अपघातस्थळ सील

राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताची CID चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश न देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक टीमने आधीच घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी आवश्यक नमुने गोळा केले आहेत. बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या Accidental Death Report (ADR) च्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.

प्राथमिक सरकारी अहवालात काय निष्पन्न? 

सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता विमान बारामती एटीसीच्या संपर्कात आले. वैमानिकांना त्या वेळी वारा कमी असून दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती देण्यात आली. पायलटने रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याचे सांगितले, मात्र रनवे दिसत नसल्याचेही त्यांनी एटीसीला कळवले. सकाळी 8.43 वाजता रनवे लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला, पण त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या, अशी माहिती एटीसी अधिकाऱ्यांनी दिली.

विमान अपघाताचा घटनाक्रम

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पुणे-बारामती परिसरात दाट धुके होते आणि दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामती विमानतळावर ILS (Instrument Landing System) सुविधा नसल्याने पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली. पहिला लँडिंग प्रयत्न रद्द झाल्यानंतर दुसरा प्रयत्न करण्यात आला. DGCA सूत्रांनुसार हे टेबल-टॉप रनवे असल्यामुळे लँडिंग अधिक जोखमीचे होते. लँडिंगदरम्यान विमानाचा सुमारे 100 फूट उंचीवर तोल गेला आणि रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच ते जमिनीवर आदळले. त्यानंतर भीषण स्फोट होऊन विमानाला आग लागली, ज्यामुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.

भीषण CCTV आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती

VSR वेंचर्स लिमिटेडचे लियर जेट 45 हे विमान लँडिंगच्या काही क्षण आधी नियंत्रणाबाहेर गेले आणि तीन तुकड्यांत फुटले. घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे कोणतीही मदत करणे शक्य नव्हते आणि काही मिनिटांतच संपूर्ण विमान जळून खाक झाले.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक