Maharashtra Holiday : अजित पवारांच्या निधनानंतर 29 जानेवारीला शाळा व बँकांना सुटी आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती

Published : Jan 28, 2026, 04:33 PM IST
ajit pawar learjet 45xr vsr aviation crash 2023 2026 letest pics

सार

Maharashtra Holiday : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत विमानातील सर्वांचा मृत्यू झाला असून, राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे, मात्र शाळा-बँकांना सुटी दिलेली नाही.

मुंबई : महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरलेल्या घटनेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचे बुधवारी सकाळी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून बारामतीकडे जाणारे त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळाजवळ कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास हे खासगी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना अपघातग्रस्त झाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघाताला दुजोरा दिला असून, बारामती विमानतळाला टेबल टॉप रनवे असल्याची माहिती दिली आहे. लँडिंगदरम्यान धावपट्टीच्या कडेला विमान कोसळल्याचे सांगण्यात आले.

या भीषण अपघातात विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे दोन सहकारी, एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक कर्मचारी आणि विमानाचे दोन क्रू मेंबर्स यांचा समावेश आहे. अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी जात होते. अपघाताच्या एक दिवस आधीच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होते. या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान अपघाताची चौकशी सुरू असून, विमान वाहतूक तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासन घटनेच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत.

29 जानेवारीला शाळा आणि कार्यालयांना सुटी आहे का?

या दुःखद घटनेनंतर सोशल मीडियावर 29 जानेवारी रोजी शाळा आणि कार्यालयांना सुटी जाहीर होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र सरकारकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांना सुटी जाहीर केली असून, तीन दिवसांचा राज्य शोक जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शाळा आणि बँकांबाबत स्वतंत्र सार्वत्रिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.

मुख्य सचिवांनी जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे की, “महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार, 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत (दोन्ही दिवसांसह) राज्यभरातील सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात यावा. या कालावधीत कोणतेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.”

अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर तीव्र शोकभावना व्यक्त केली जात आहे. राज्याने आपल्या एका प्रभावी आणि अनुभवी नेतृत्वाला गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक