Nashik TCS Case : निदा खानला आश्रय देणं भोवलं, AIMIM नगरसेवकाच्या मालमत्तेवर पालिकेचा बुलडोझर

Published : May 13, 2026, 11:39 AM IST
Visual from outside the property of AIMIM corporator Mateen Majid Patel (Photo/ANI)

सार

Nashik TCS Case : नाशिकच्या गाजलेल्या TCS प्रकरणातली आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या AIMIM चे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. महापालिकेने पटेल यांचं घर आणि कार्यालय बेकायदेशीर ठरवून जमीनदोस्त केलं.

Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बुधवारी एक मोठी कारवाई केली. AIMIM चे नगरसेवक मतीन माजिद पटेल यांच्या मालमत्तांवर बुलडोझर चालवण्यात आला. नाशिकच्या TCS प्रकरणातली आरोपी निदा खान फरार असताना तिला आश्रय दिल्याचा आरोप पटेल यांच्यावर आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पटेल यांचं कार्यालय आणि घर असलेल्या इमारतींच्या कायदेशीरतेबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तीन दिवसांची मुदत संपल्यानंतर आज सकाळीच महापालिकेने ही कारवाई सुरू केली.

मतीन पटेलांच्या घरावर महापालिकेचा बुलडोझर

मतीन पटेल यांनी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिला होता, असा आरोप आहे. याच कारणामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आणि महापालिकेने त्यांचं घर आणि कार्यालय बेकायदेशीर बांधकाम ठरवून पाडकाम केलं. या प्रकरणातली मुख्य आरोपी निदा खानला सोमवारी नाशिक रोड कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर तिची रवानगी नाशिक रोड सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली.

TCS मधील नक्की प्रकरण काय? 

नाशिकमधील TCS कंपनीच्या कार्यालयात काही कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ करणे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात निदा खान एक आरोपी आहे.वकील मिलिंद कुरकुटे यांनी माहिती दिली की, आरोपींच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या या गुन्ह्यात जामीन अर्जावर दुसऱ्या दिवशी सुनावणी होईल, असंही ते म्हणाले.

या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करत आहेत. याआधी निदा खान पोलीस कोठडीत होती, जिथे तिची या प्रकरणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं. तिला छत्रपती संभाजीनगरमधूनच ताब्यात घेण्यात आलं होतं.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Drought : महाराष्ट्रात भीषण दुष्काळ; मदतीसाठी सरकारची तयारी सुरू
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका