काय आहे लाडका भाऊ योजना? तरुणांना दरमहा 10 रुपये मिळणार - राज्य सरकारची योजना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांसाठीही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला ६००० रुपये, डिप्लोमा पूर्ण करणाऱ्याला ८००० रुपये, आणि पदवीधरांना १०००० रुपये दिले जातील.

vivek panmand | Published : Jul 17, 2024 6:05 AM IST / Updated: Jul 17 2024, 12:29 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता भावांसाठी योजना जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारकडून २१ ते ६० वयोगटातील महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी १ जुलै २०२४ रोजीपासून केली जाणार आहे. आता लाडक्या भावांसाठी सरकारच्या वतीने योजना केली जाणार आहे. 

काय आहे ही योजना - 
आपण सर्वात आधी ही योजना नेमकी काय आहे ते समजून घेऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे विठ्ठल रुख्मिणीची पूजा केल्यानंतर लाडक्या भावांसाठी योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जो युवक १२ वी मध्ये उत्तीर्ण झाला असेल त्याला सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्याला आठ हजार रुपये आणि पदवी पूर्ण करणाऱ्याला दहा हजार रुपये सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत. 

सरकार भरणार तरुणांचे पैसे -
राज्यातील तरुण कुशल होऊन त्यांना रोजगार मिळावा हा यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील तरुणांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एखाद्या कारखान्यात अप्रेंटीशीप करतील येथे अनुभव घेतल्यानंतर त्याला याच्या बळावर नोकरी मिळेल. राज्यात आपण कुशल मनुष्यबळ तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडका भाऊ अशी योजना तर नाही ना राबवणार असेही प्रश्न आता सोशल मीडियामधून उपस्थित होताना दिसत आहेत. 
आणखी वाचा - 
Baramati Accident : बारामतीत पालखी महामार्गावर टायर फुटल्याने कारचा अपघात, १ ठार
18 जुलैला उघडणार जगन्नाथ पुरीचा खजिना, मंदिरात प्रवेश करण्यावर घालण्यात आली बंदी

Share this article